महिलांच्या नावावर जमीन, प्लॉट खरेदी करा व मिळवा या विशेष सवलती!

गावाकडून शहरामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. परंतु दिवसेंदिवस घराच्या किंमती एवढ्या वाढत चाललेल्या आहेत की ते घेणे आवाक्याबाहेरचे होत चाललेले आहे. अनेकांचे स्वप्न जागेच्या व बांधकामाच्या वाढत्या किंमतीमुळे तुटत चालले आहेत. परंतु शासनाच्या वतीने महिलांच्या नावे घर किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे हे थोडे सुलभ होण्यास मदत मिळते. घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून काही सवलती दिल्या जातात. केंद्र व राज्य सरकार हे महिलांचा समाजातील आर्थिक सहभाग वाढावा यासाठी विविध सवलती योजना राबवत असते. त्यामुळे अनेक नागरिक पत्नी, आई किंवा बहिणीच्या नावावर प्लॉट खरेदी करत आहेत. ही एक सामाजिक बदल घडवणारी सकारात्मक बाबा आहे. त्याचबरोबर महिलांच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होते व त्या स्वावलंबी देखील बनतात.

मिळणाऱ्या सवलती-

  • मुद्रांक शुल्कात सवलत-

घर किंवा प्लॉट खरेदी करताना ग्राहकांना ‘मुद्रांक शुल्क’ हे भरावे लागत असते. मुद्रांक शुल्क हे प्रॉपर्टीच्या किंमतीनुसार ठरवले जाते व तेलाखोंच्या घरात जाते. परंतु जर महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केली तर या शुल्कामध्ये 1 ते 2 टक्यांपर्यंत सवलत दिली जाते. अनेक राज्यांमध्ये ही सुट लागू करण्यात आली असल्यामुळे यामुळे खरेदी खर्चात मोठा फरक जाणवत आहे.

  • गृहकर्जावर कमी व्याजदर-

बँक व गृह वित्त संस्थाकडून महिलांसाठी गृहकर्जावर विशेष व्याजदर सवलत देखील देण्यात येते. सरासरी 0.05% ते 0.10% पर्यंत व्याजदरामध्ये सूट मिळत असते. ही सूट दीर्घकालीन कर्जामध्ये लाखो रुपयांची बचत करण्यास मदत करते. म्हणूनच अनेक पुरुष सुद्धा पत्नीच्या नावाने प्लॉट खरेदी करून कर्ज सवलतीचा लाभ घेतात.

  • आर्थिक स्वावलंबन व सुरक्षितता-

महिलांच्या नावावर मालमत्ता जर असेल तर तिच्या आर्थिक स्वावलंबन वाढते. तसेच एखाद्या संकटाच्या काळामध्ये ती आर्थिक दृष्ट्या यामुळे सक्षम असते. मालमत्ता तिच्या नावे असेल तर ती तिच्या हक्काने मालकीचा दावा करू शकते. यामुळे अनेक कुटुंबे महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणाचा विचार करून ही गुंतवणूक करतात.

  • कर सवलत व इतर फायदे-

महिला घरमालकांना आयकर सवलती मिळते. त्याचबरोबर अनेक योजना जसे की पीएम आवास योजना, महिला विशेष गृहकर्ज योजना, यांचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळतो. काही राज्यांमध्ये महिला मालक असल्यास स्थानिक करामध्ये सवलत किंवा गृहकरात कपात देण्यात येते.

नागरिकांचा वाढता कल-

या सर्व सवलती व फायदे लक्षात घेता महिलांच्या नावावरती प्लॉट किंवा घर खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. ही बाब फक्त आर्थिक बचतीसाठी नाही तर महिलांच्या सशक्तीकरणासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे शासनाच्या धोरणांचा उपयोग करून अनेक कुटुंबे आपली स्वप्न पूर्ण करत आहेत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *