आधार कार्ड हे शाळा, महाविद्यालये त्याचबरोबर शासकीय कामांसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे कागदपत्र आहे. याचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ ही घेता येतो. त्यामुळे ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ तर्फे नवजात मुलांनाही आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहे. जरी 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनविण्यात आलेले असले तरी त्यामध्ये दोन वेळा बायोमेट्रिक बदल करणे आवश्यक आहे.
याकडे आता शासकीय यंत्रणांनी लक्ष वेधले आहे. 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. परंतु या वयोगटातील मुलांचे वय वाढल्यामुळे त्यांच्या बोटांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे नमुने पुन्हा नोंदवणे गरजेचे आहे. या वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट केल्यामुळे अचूक माहिती मिळते. तसेच त्यामुळे भविष्यातील शैक्षणिक, आर्थिक सेवांचा लाभ मुलांना मिळण्यास अडचण येत नाही.
यासाठी कोणतेही शुल्क नाही-
मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे हे विनाशुल्क आहे. परंतु जर आधार कार्डमध्ये काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठीनाममात्र शुल्क आकारण्यात येते.
बायोमेट्रिक तपशील बंधनकारक-
पालक कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन मुलाचा जन्माचा दाखला किंवा डिस्चार्ज कार्ड/हॉस्पिटलद्वारे जारी केलेल्या स्लिपद्वारे आधार कार्ड बनवू शकतात. त्याचबरोबर मुल 5 व 15 वर्षांचे झाल्यावरती बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे गरजेचे आहे. ज्या मुलांचे आधार कार्ड 5 वर्ष पूर्ण होण्याअगोदर काढलेले आहे त्यांचे बायोमेट्रिक्स, डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते.
त्यामुळे अशा मुलांच्या नावनोंदणीच्या वेळी त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाही. यामुळे युआयडीएआयने 5 वर्षानंतर आधार अपडेट करणे अनिवार्य केलेले आहे. ज्यावेळी मुल पौगंडावस्थेमध्ये प्रवेश करते, तेव्हा त्याच्या बायोमेट्रिकमध्ये बदल होतात. त्यामुळे वयाच्या 15 वर्षाचे झाल्यानंतर बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे गरजेचे आहे.
अद्यावत करण्यासाठी लागणारा वेळ-
सामान्यतः 30 ते 90 दिवसांचा वेळ आधार तपशील अपडेट करण्यासाठी लागतो. हे अपडेटच्या प्रकारावर व पडताळणी प्रक्रियेवर अवलंबून असते.
यासाठी कोठे संपर्क करावा?-
आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाऊन कार्ड अपडेट करता येते. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस, शासकीय आधार केंद्रात कार्ड अपडेट करता येते. नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा