फेब्रुवारी ते मार्च 2025 या दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आता लागलेले होते. ही परीक्षा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे निकालाच्या तारखेसाठी सर्वजण उत्सुक असतात. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे.
या निकालाची विद्यार्थी व पालक मोठ्या अतुरतेने वाट पाहत होते. यंदा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ही अधिक वेगवान तसेच तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या गुणपत्रिका या डिजीलॉकर अॅपबरोबर उमंग अॅप व IVRS या सिस्टिमवर डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
जूनमध्येच श्रेणी किंवा गुणसुधार योजनेच्या माध्यमातून आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. तसेच त्यांचा निकाल बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया संपण्याच्या अगोदर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कसलीही चिंता करण्याची गरज नाही. निकालानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 6 ते 20 मेपर्यंत https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
कधी निकाल जाहीर होणार?-
बारावीचा निकाल आज म्हणजे 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रत्येक वर्षी बारावीचा निकाल हे ऑनलाईन जाहीर करते. यंदाही त्याच प्रकारे निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल हा आज दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी 15 लाख विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यामुळे सर्वच विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.
बारावीचा निकाल कोठे पाहता येईल?-
बारावीचा निकाल या तीन वेबसाईटवरती पाहता येईल.
डिजिलॉकर या वेबसाईटवरती निकाल कसा पाहावा?-
- सर्वात अगोदर digilocker.gov.in या वेबसाईटवरती यावे.
- त्यामध्ये तुमचे अकाउंट लॉगिन करावे किंवा साइन अप करून नवीन खाते तयार करावे.
- त्यानंतर ‘Education’ किंवा ‘CBSE Result’ या विभागामध्ये जावे.
- त्यामध्ये तुमचा CBSE रोल नंबर, शाळेचा नंबर व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर ‘Submit’ या बटनावर क्लिक करायचे आहे.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसणार आहे व तुम्ही तो डाऊनलोड करून किंवा प्रिंट करु शकता.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.