राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. राज्यामधील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे, अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही? हे चेक कसे करावे? याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.
बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही कसे तपासावे?-
- लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले असल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस येईल.
- जर बँकेकडून एसएमएस नाही आला तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावरती एसएमएस पाठवता येतो किंवा टोल फ्री क्रमांकवरती मिस्ड कॉल देऊन देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या बाबतीमध्ये जाणून घेता येते.
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेट बँकिंग, गुगल पे किंवा फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
- डेबिट कार्ड असेल तर एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
- तसेच बँकेमध्ये जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत की नाही हे पाहू शकता.
डीबीटी लिंक स्टेटस तपासणी-
- सर्वात अगोदर माय आधार वेबसाईटवरती जावे.
- त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकावा.
- त्यानंतर लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करावे.
बँक खाते व आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेट्स तपासणी-
- ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपले आधार डॅशबोर्ड पहावे.
- त्यानंतर बँक सीडींग स्टेटसवरती क्लिक करून तपसावे की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
- जर स्टेटस ऍक्टिव्ह असे दिसत असेल, तर तुमचे बँक खाते हे आधारसाठी डीबीटी लिंक आहे असणार आहे.
डीबीटीचे फायदे- डीबीटीमुळे सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात.
जर लिंक नसेल तर-
- जर लिंक नसेल तर आपल्या जवळच्या बँक शाखेत जावे.
- आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरून द्यावा.
- तो फॉर्म बॅंक अधिकाऱ्याकडे द्यावा.
- लिंकिग प्रक्रियेला 2-3 दिवस लागतात.
- नंतर ऑनलाईन स्टेटस तपासावे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर नक्की शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group
Join Now