सोलर पंप योजनेमध्ये मोबाईल नंबर बदल करण्याचा मेसेज कोणत्या कारणामुळे आलेला आहे?

शेतकऱ्यांना मागील त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप दिले जातात. या योजनेची सध्या स्थिती अशी आहे, की अनेक शेतकरी जे आहेत ते सोलर पंपाच्या प्रतिक्षित आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप इन्स्टॉल करण्याचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सध्या मोबाईल नंबर अपडेट करण्याचे मेसेज देखील येत आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया हे मेसेज नक्की कोणत्या कारणामुळे येत आहेत व मोबाईल नंबर अपडेट कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला अर्ज प्रक्रिया, वेंडर सिलेक्शन व शुल्क भरणे इत्यादी प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांना साहित्य देखील मिळालेले आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप इन्स्टॉल देखील करण्यात आलेले आहेत. परंतु अशाच काही शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्याचा मेसेज येत आहे.

‘Application with Duplicate mobile number found please Register your new mobile number for future processing application’ असा मेसेज येत आहे. या मेसेजचा अर्थ असा आहे, की तुमच्या अर्जासोबत चुकीचा मोबाईल नंबर जोडला गेलेला आहे. कृपया तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पुढील प्रक्रियेसाठी जोडावा. शेतकऱ्यांचे हे मोबाईल नंबर मेडा कुसुमसह महावितरणच्या योजनांसाठी वापरला गेले असल्यामुळे पुन्हा नवीन नंबर जोडण्यासाठी मेसेज येत आहे. तर शेतकऱ्यांना हा मोबाईल नंबर जोडणे बंधनकारक आहे, असे महावितरणमार्फत सांगण्यात आलेले आहे.

मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया-

  • सोलर पंप योजनेमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वात अगोदर सोलर पंप योजनेच्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • त्यातील Beneficiary Services मधील Application Current Status या पर्यायावरती क्लिक करावे.
  • त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेला एमकेएमटीआयडी म्हणजेच लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे व शोधा या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुढील विंडोमध्ये चेंज मोबाईल नंबर असा पर्याय दिसेल. त्या रकान्यात तुमचा जुना नंबर टाकायचा आहे व खालील रकान्यात नवीन नंबर टाकायचा आहे.
  • मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे तुम्हाला त्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला महावितरणकडून मोबाईल नंबर बदलल्याचा मेसेज येईल.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *