शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचे अनुदान ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान पिक विमा योजना, किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनांच्या लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा नेमक्या कोणत्या बँकेच्या अकाउंट नंबर आपण सदर अर्जासोबत दिलेले आहे किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान नेमकं कोणत्या बँकेत जमा होणार आहे, असे प्रश्न पडतात. चालू घडीला शेतकऱ्यांचा खात्यामध्ये पिक विमा अनुदान जमा होत आहे. परंतु नेमकं कोणत्या बँकेत हे अनुदान जमा होत आहे हे लक्षात येत नाही. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अनुदान नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे ते कसे पहायचे.
कोणत्या बँकेत अनुदान जमा झालेले आहे पाहण्याची पद्धत-
- सर्वात अगोदर एनपीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- त्या ठिकाणी तुम्हाला काही पर्याय दाखवण्यात आलेले आहे त्यापैकी Consumer नावाच्या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तेथील भारत आधार सीडिंग इनेबल नावाच्या पर्यावर क्लिक करायचा आहे.
- पुढील विंडोवर इंटरव्यू एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल. त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याखाली कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करावे.
- यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसेल, जसे की आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम व बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती आपल्याला दिसणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.