पीएम किसान योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय!

पीएम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात तीन समान हफ्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000/- रुपये जमा केले जातात. परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते काही लाभार्थ्यांना अनेक दिवसापासून मिळणे बंद झालेले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याची कारणे कोणती व यावर उपाय काय आहे?

सदर योजनेचे हप्ते बंद होण्याची कारणे व उपाय-

  • जमिनीचे प्रमाणिकरण करून घेतलेले नसणे- जर Land Seeding करून घेतलेले नसेल तर महसूल विभागाशी संपर्क साधून ते करून घ्यावे.
  • ई-केवायसी नसेल केलेली तर- ई-केवायसी करण्यासाठी स्वतः, सीएससी किंवा गावातील कृषी सहायक यांच्या मार्फत करून घ्यावी.
  • बँक खाते आधार लिंक नसेल तर- बँक खाते जर आधार लिंक नसेल तर ते करून घ्यावे किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन DBT Enable खाते उघडावे.
  • आधार लिंक बँक खाते बंद असल्यास- ते बँक खाते खाते सुरू करून घ्यावे.
  • नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती करणे गरजेचे- स्वतः किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन आधार दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरला केला असल्यास- अर्ज हा अपात्र होणार आहे.
  • स्वत: योजनेचा लाभ समर्पित केला असेल तर- परत लाभ घेता येणार नाही.
  • विविध कारणास्तव अर्ज अपात्र असल्यास- जर पात्र असून देखील  अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह (कागदपत्रे) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपात्रता मागे घेण्यासाठीचा अर्ज करणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे- यामुळे अर्ज अपात्र करण्यात येतो.
  • नोंदणी नंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणारा- जर नोंदणीनंतर त्या जमिनीची विक्री केली असेल तर या योजनेचा लाभ परत घेता येत नाही.
  • बँकेकडून व्यवहार नाकारण्यात आला असेल तर- जर बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दूर करून घ्याव्यात.

अधिक माहितीसाठी संपर्क-

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याशी संपर्क साधावा.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *