राज्यांमध्ये महसूल विभागाच्या तर्फे ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपली बोअरवेल स्वतःहून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बोअरवेल, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून सातबारावर बोअरवेल कशी नोंदवावी हे सदर लेखातून आपण जाणून घेऊया.
ई-पीक पाहणी अॅप कसे घ्यावे-
ई-पीक पाहणी अॅप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करावे. त्यामध्ये ई-पीक पहाणी 2.0 असे नाव शोधा. आपणास ई-पीक पाहणी हे ॲप दिसेल. त्यानंतर ते इन्स्टॉल करा किंवा येथे क्लिक करून ते डाऊनलोड करा.
अशी भरा नवीन खातेदाराची माहिती-
- नवीन खातेदार नोंदणी करा.
- तुमचा विभाग निवडा.
- तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडा.
- तुमचे नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कोणत्याही एका पर्यायाची निवड करुन माहिती भरावी.
- त्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.
- खातेदार निवडावर क्लिक करुन आपले नाव निवडा.
- आता पुढील बटनावर क्लिक करा.
- आपला मोबाईल क्रमांक भरा. त्या नंबरवर जो OTP येईल तो भरावा.
आता आपली खातेदार नोंदणी पूर्ण झालेली आहे.
या पद्धतीने भरा ई-पीक पाहणी माहिती-
खातेदाराचे नाव निवडा
- 4 अंकी संकेतांक भरा (जर संकेतांक माहिती नसेल तर संकेतांक विसरलात यावर क्लिक करावे)
- त्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायवर क्लिक करावे.
- खाते क्रमांक निवडा
- गट क्रमांक निवडा
- तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल
- तुमचे पोट खराब क्षेत्र दाखवेल
- हंगाम कोणता आहे तो निवडा
- एकूण पेरणीयोग्य क्षेत्र दाखवेल
- पिकाचा वर्ग निवडा
- पिकाचा प्रकार निवडा(पीक/ फळबाग)
- पिकाचे नाव निवडा
- जल सिंचनाचे साधने निवड करा
- सिंचन पद्धत निवडा
- लागवडीचा दिनांक अचूक भरा
- अक्षांश रेखांश मिळवा यावर क्लिक करा
- त्यानंतर आपल्या पिकाचा फोटो घ्या
- सर्वात शेवटी सबमिट या बटनवर क्लिक करा.
महत्वाचे मुद्दे-
- जर माहिती नेटवर्कमध्ये नसल्यामुळे किंवा इंटरनेटच्या अभावामुळे अपलोड झालेली नसेल तर नेटवर्कमध्ये आल्यानंतर होम पेजवरील अपलोड पर्यावर क्लिक करून माहिती अपलोड करावी. म्हणजेच याचा अर्थ असा की या नोंदणीसाठी मोबाईल नेटवर्कची गरज नाही. आपण नोंदवलेली माहिती सबमिट बटनवर क्लिक केले की साठवली जाईल व मोबाईल नेटवर्कमध्ये आल्यावर ती माहिती डॅशबोर्डवर असलेल्या अपलोड या पर्यावर क्लिक करून आपण अपलोड करू शकता.
- जर माहिती मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर डाव्या कोपऱ्यातील रद्द या बटणावर क्लिक करून आपणास परत मागील पानावर नेले जाईल तेथे आवश्यक ती दुरुस्ती करून प्रक्रिया पूर्ण करावी.
- या नोंदणीबाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ॲपमध्ये मदत या बटनावर क्लिक करून तेथे देण्यात आलेल्या प्रश्न उत्तरांमधून आपल्या प्रश्नांचे निराकरण आपण करू शकता.
- तेथे आपणास आपला अभिप्राय देखील नोंदवता येतो.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

