महाडीबी पोर्टल वर लॉटरीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येते. “अर्ज एक योजना अनेक” या धर्तीवर सुरू करण्यात आलेले आपले सरकार महाडीबीटी पोर्टल हा कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेला महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यास एकाच अर्जामध्ये अनेक योजनांचा लाभ घेता येतो. राज्य शासनाद्वारे त्याचबरोबर केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. अशा बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे थकीत असलेले अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यास सुरवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की महाडीबीटी योजनांचा लाभ मिळत नाही किंवा गावामध्ये तर लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजनांचा लाभच दिला जात नाही किंवा हे अनुदान देण्यात येतच नाही. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया गावात कोणाला अनुदान मिळाले? कोण पात्र झाले? पाहण्याची पध्दत. हे ऑनलाईन पद्धतीचे मोबाईलवर सुद्धा घरी बसल्या पाहता येते.
ऑनलाईन यादी पाहण्याची सोपी पद्धत-
- सर्वात अगोदर महाडीबी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
- तेथे तुमच्यासमोर डाव्या बाजूला अर्जाची सध्यास्थिती तपासा, लॉटरी यादी व निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसतील.
- ज्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे व जे लाभार्थी योजनेच्या माध्यमातून पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची यादी देखील येथे पाहता येणार आहे.
- जर तुम्हाला लाभार्थी यादी पाहायची असे तर निधी वितरित लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर लाभार्थी तपशील शोधा यामध्ये सर्वात अगोदर जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका व गावाचे नाव टाकून शोधा या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या गावाची लाभार्थी यादी आपल्या समोर ओपन होईल.
- त्यामध्ये आपले गाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे पाहता येते.
- यामध्ये मागील काही वर्षांची यादी देखील आपल्याला पाहता येणार आहे. तसेच सर्वात शेवटी 2024-25 या वर्षातील देखील लाभार्थी यादीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांची नावे आपल्याला पाहता येणार आहेत.
- त्याचबरोबर किती तारखेला अनुदान क्रेडिट झालेले आहे व कुठल्या बाबीसाठी हे अनुदान देण्यात आलेले आहे ही माहिती देखील यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ती आपल्याला दिसणार आहे.
- शेतकरी ही लाभार्थी यादी मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र व ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इत्यादी ठिकाणी पाहू शकतात.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

