आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती.

अनेक शेतकरी सध्या फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना सहज मिळण्यास मदत मिळते.

अ‍ॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजना पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेले डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेता येणार आहेत, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करता येणार आहेत कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे यामुळे शक्य होणार आहे. विविध शेतकरी व कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे देखील यामुळे सुलभ होणार आहे.

या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या पोर्टलवर दिलेला आपला मोबाईल नंबर कसा बदलायचा? याची नोंदणी करत असताना एकच गट समाविष्ट केला आहे आता दुसरा गट समाविष्ट कसा करायचा? असे अनेक प्रश्न निर्मान होत होते. परंतु यावर दुरुस्तीचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. परंतु आता या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबरसह इतर माहिती दुरुस्त करता येणार आहे. म्हणजे दुरुस्तीची सोय करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी ऑनलाईन दुरुस्ती करण्याची पद्धत.

फार्मर आयडी कार्ड मधील माहिती ऑनलाईन दुरुस्त करण्याची प्रक्रिया-

  • ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्ड ऑनलाईन दुरुस्त करण्यासाठी सर्वात अगोदर https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/  या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला Log in as मध्ये दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी Farmar या पर्यायावर क्लिक करून ओटीपी व कॅप्चा टाकून Log in वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये Farmer Registry मध्ये Update My Information या पर्यावर क्लिक करावे.
  • Update My Information  या पर्यायावर क्लिक केल्यावर मोबाईल नंबर बदल करण्यासाठी विचारले जाते. यासाठी जुना मोबाईल नंबर टाकून Verify करून ओटीपी टाकायचा आहे व नवीन मोबाईल नंबर टाकून Verify करून ओटीपी त्यामध्ये टाकायचा आहे.
  • त्याचबरोबर यामध्ये जमिनीबाबत काही दुरुस्ती करायची असेल तर ती पण करता येते किंवा अजून नवीन जमिनी ऍड करायची असेल तर ती पण येथे करता येते. त्यासाठी Add New Land या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, व गाव टाकून जमिनीची माहिती टाकून Update करायचे आहे.
  • तसेच KYC मध्ये जर काही बदल करायचे असतील तर तेही इथे करता येतात.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *