रेशन कार्डला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव बरोबर असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया म्हणजेच ई-केवायसी. राज्य शासनाद्वारे देण्यात आलेली 31 मार्चची मुदत आता वाढवून 30 एप्रिल करण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांची नावे शिधापत्रिकेवरून वगळण्यात येणार आहेत.
राज्य शासनाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याची सूचना याअगोदरच सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे यासाठी या अगोदर अनेकदा मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे.
त्यानंतर 31 मार्चची शेवटची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ई-केवायसी न केलेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा मुदतवाढ 30 एप्रिल ही शेवटची तारीख दिलेली आहे. यानुसार सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला प्रलंबित असलेली ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत.
जर ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिलच्या अगोदर पूर्ण केली नाही तर शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने मेरा ई-केवायसी हे मोबाईल ॲप सुरु केलेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी या अॅपद्वारे आपली ई-केवायसी पूर्ण करावी.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.