अखेर RTE लॉटरी निकाल यादी जाहीर झालेली आहे. आता RTE लॉटरी यादी पाहता येणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यादीमधील आपले नाव कसे पाहावे व महत्त्वपूर्ण काय काय सूचना आहेत याबद्दलची माहिती.
महत्त्वपूर्ण सूचना-
- आर.टी.ई 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे पालकांनी गोंधळून न जाता पुन्हा काही वेळाने प्रयत्न करावा.
- निवड यादीतील(List No.1) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14-02-2025 पासून 28-02-2025 पर्यंत राहणार आहे.
- निवड यादीतील प्रवेश पात्र पाल्याच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे दिलेली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रती घेऊन जाणे गरजेचे आहे. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यायची आहे. पालकांनी आपल्याबरोबर आर.टी.ई पोर्टलवर देण्यात आलेल्या हमी पत्राची प्रिंट देखील बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे.
- आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षासाठी निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील; परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी.
- अर्ज भरताना जी कागदपत्रे दिलेली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे गरजेचे आहे.
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादी विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवण्यात येतील.
लॉटरी यादी कशी डाऊनलोड करावी-
- लॉटरी यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- यानंतर Select/मूळ निवड यादी या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये Academic Year 2025-26 निवडावे, आपला जिल्हा निवडावा व Selection list No. मध्ये Selection List 1 ची निवड करुन Go बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही लॉटरी यादी डाऊनलोड करू शकता.
लॉटरी प्रतीक्षा यादी कशी पाहावी-
- लॉटरी प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर WATING LIST/प्रतीक्षा यादी या पर्यावर क्लिक करावे.
- त्यामध्ये Academic Year 2025-26 निवडावे व आपला जिल्हा निवडून Go बटनावर क्लिक करावे.
- अशा प्रकारे तुम्ही वेटिंग लिस्ट डाऊनलोड करू शकता.
नक्की नंबर लागला आहे की नाही कसे चेक करावे?-
- सर्वात अगोदर वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे
- त्यातील वरती दिलेल्या Online Application या बटणावर क्लिक करावे.
- फॉर्म भरताना जो लॉगिन आयडी पासवर्ड टाकला होता तो टाकून कॅपच्या भरून Login करावे.
- Application No. च्या पुढे Confirmed असे दाखवते.
- त्याचबरोबर Admit Card च्या पर्यायावर क्लिक केल्यावर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना View and Print चा पर्याय येतो. त्यावरती क्लिक केले की हे अॅडमिट कार्ड म्हणजेच अलॉटमेंट लेटरची प्रिंट व हमी पत्र घेऊन जायचे आहे.
- जर काही विद्यार्थ्यांचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये दाखवत असेल तर त्या विद्यार्थ्यांचा नंबर वेटिंग लिस्ट मध्ये लागलेला आहे. तसेच जर काही विद्यार्थ्यांना काहीच दाखवत नसेल तर त्यांचा नंबर लागलेला नाही असे समजावे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now