FASTag साठी एनपीसीआयने नवीन नियम लागू केलेले आहेत. त्यामध्ये टोल प्लाझावर टॅग स्कॅनकरण्याअगोदर 60 मिनिटे किंवा 10 मिनिटे टॅग काळ्या यादीत राहिला तर पैसे कट होणार नाही. या नियमानुसार वापरकर्त्यांना त्यांचे FASTag स्टेटस दुरुस्ती करण्यासाठी 70 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
FASTag चा नवीन नियम-
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 28 जानेवारी 2025 रोजी एक नवीन नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार 17 फेब्रुवारी 2025 पासून जर टोल प्लाझावर टॅग रीड करण्याच्या अगोदर 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला तर किंवा रीड केल्यानंतर किमान 10 मिनिटांसाठी टॅग ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास पैसे दिले जाणार नाही. या नवीन नियमामुळे वापरकर्त्यांना त्याच्या FASTag ची स्थिती दुरुस्त करण्यासाठी 70 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
या बदलाचा वापरकर्त्यांवर कसा परिणाम होणार-
नवीन नियमाचा थेट परिणाम हा वापरकर्त्यांवर होणार आहे. नवीन नियमामुळे आता टोल नाक्यावर ब्लॅकलिस्टेड FASTag चा शेवटच्या क्षणी रिचार्ज केल्याने तुमचे नुकसान होणार आहे. तसेच याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही टोलवर पोहोचता तेव्हा तुमचा फास्टॅग अगोदरच ब्लॅकलिस्ट केलेला असेल तर लगेच रिचार्ज केल्याने पैसे मिळणार नाहीत.
तुम्ही ते असे समजू शकता-
जर तुमचा FASTag टोलवर पोहोचण्या अगोदरच ब्लॅकलिस्ट केला गेला व ब्लॅक लिस्ट केला गेला व टॅग़ रीडनंतरही ब्लॅकलिस्टमध्येच राहिला तर पेमेंट होणार नाही व तुमच्याकडून दुप्पट टोल घेतला जाणार आहे. जर तुमचा FASTag ब्लॅकलिस्टेड असेल परंतु जर तुम्ही टॅग रीडपासून 60 मिनिटांच्या आत किंवा रीडपासून 10 मिनिटांच्या आत रिचार्ज केला तर तुमचे पेमेंट मिळेल व तुमच्याकडून सामान्य रक्कम घेतली जाणार आहे.
FASTag ब्लॅकलिस्ट स्टेटस कसे तपसावे-
- परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- ‘ई-चालान स्टेटस तपासा” किंवा तत्सम या पर्यायाची निवड करा.
- त्यानंतर तुमचा वाहन नोंदणी क्रमांक टाकावा.
- अशाप्रकारे तुम्हाला तुमचे वाहन ब्लॅकलिस्टेड आहे की नाही हे कळणार आहे.
FASTag कसे अनब्लॉक करावे-
- सर्वात अगोदर FASTag रिचार्ज करावे. त्यानंतर किमान शिल्लक रक्कम ठेवावी.
- नंतर पेमेंटची पडताळणी करावी.
- त्यानंतर FASTag ची स्थिती कळणार आहे.
- काही वेळामध्येच FASTag सक्रिय होणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.