शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून राज्यातील खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी सोमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यातील किती शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे? याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. तसेच या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती पालकांना मेसेजद्वारे 14 फेब्रुवारीपासून पाठवण्यात येणार आहे.
यंदा शाळा कमी झाल्या असल्या तरी प्रवेश क्षमतेत पाच हजारांनी वाढ झालेली आहे. ऑनलाईन लॉटरीची माहिती आता राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) कार्यालयाला पाठवण्यात आलेली असून त्याआधारे एनआयसीकडून मुलांच्या प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांची माहिती शिक्षण विभागाला कळवण्याचे आवाहन आयुक्तांद्वारे करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेची माहिती-
शाळा- 8863
जागा- 109087
अर्जांची संख्या- 305159
पुणे जिल्ह्यातील शाळांची संख्या- 960
प्रवेशक्षमता- 18498
प्रवेश अर्ज- 61573
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.