आज आपण सदर लेखातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कापूस व सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्याचे जाहीर केलेले आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे. कापूस व सोयाबीन हमीभाव केंद्र सरकारने 2024-25 साठी जाहीर केलेला आहे.
हमीभावातील बदलाचे फायदे-
कापूस व सोयाबीनच्या हमीभावात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे उत्पादन खर्चाची भरपाई देखील होण्यास मदत मिळणारआहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
कापसाचा नवीन हमीभाव-
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या हमीभावापेक्षा यामध्ये 501 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
- मध्यम धागा कापूस- रु.7,121/-
- लांब धागा कापूस- रु.7,521/-
सोयाबीन हमीभावात सुधारणा-
सोयाबीन हमीभावात देखील वाढ जाहीर करण्यात आलेले आहे. ही वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी फायद्याची ठरणार आहे.
- वर्ष 2023-24 – रु.4,600/-
- वर्ष 2024-25 – रु.4,892/-
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मदत-
केंद्र सरकारने कापूस व सोयाबीन खरेदीसाठी विविध संस्थाची नियुक्ती केलेली आहे.
- कापूस खरेदीसाठी:
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (C.C.I)
- सोयाबीन खरेदीसाठी:
नाफेड (NAFED)
एन.सी.सी.एफ. (NCCF)
राज्य सहकारी पणन महासंघ
विदर्भ पणन महासंघ
खरेदी व्यवस्थेतील सुधारणा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत. खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात असे देखील सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्वरित पैसे द्यावेत, याबाबतीतही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कापूस-सोयाबीन हमीभाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा-
कापूस व सोयाबीन हमीभावात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य तो मोबदला मिळणार आहे. तसेच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेती व्यवसायाला मोठा आधार मिळालेला आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
टीप- रोजचा कापूस-सोयाबीन किंवा इतर पिकांचा बाजार भाव आपण शासनाच्या खाली दिलेल्या वेबसाईटवर पाहू शकता.