आधारकार्ड बाबत लवकरात लवकर हे काम करा, नाहीतर नुकसान होईल?

चालू घडीला आधारकार्ड हे अतिशय महत्त्वाचे असे ओळखपत्र बनलेले आहे. या आधार कार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनेचा लाभ घेता येतो. तसेच बँक खाते खोलण्यासाठी देखील आधार कार्डची गरज भासते. आधार कार्ड शिवाय कोणतेही शासकीय काम पूर्ण होत नाही. त्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.

तसेच आता आधार कार्ड संबंधित एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकार हजारो नागरिकांचे आधार कार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. कारण अनेक जणांनी आधारकार्ड अपडेट केलेले नाहीत, त्यामुळे सरकार यासाठी यापुढे पैसे आकारू शकते. UIDAI ने 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुने आधारकार्डवरील आपली माहिती अपडेट करण्याची मोफत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

तसेच आधारकार्डची माहिती अपडेट करण्यासाठी शासनाकडून अनेक वेळा डेडलाईन देखील देण्यात आलेल्या होत्या. परंतु तरी देखील हजारो नागरिकांनी आपले आधारकार्ड अपडेट केलेले नाहीत. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार आधार कार्ड अपडेट करणे जास्त आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी अजून देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ‘MyAadhaar’ या पोर्टलवर जाऊन आपली माहिती अपडेट करणे गरजेचे आहे.

आधारकार्ड अपडेट करणे का गरजेचे आहे?-

मागील 10 वर्षांमध्ये काही आधार कार्डधारकांनी आपला फोटो किंवा रहिवासी पत्ता यामध्ये बदल केलेला असल्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधार कार्डच्या माध्यमातून ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या टाळण्यास देखील मदत होणार आहे. तसेच शासनाला देखील यामुळे योग्य माहिती मिळण्यास मदत होणार आहे. UIDAI ने 10 वर्षाअगोदरचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची मुदत दिलेली आहे.

या अगोदर 14 मार्च, त्यानंतर 14 जून व त्यानंतर 14 सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून देण्यात आलेली होती. आताही डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे सरकारकडून अवाहन केले जात आहे.

आधार कार्ड अपडेट कसे करावे?-

  • सर्वात अगोदर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी ‘MyAadhaar’ च्या uidai.gov.in/en या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करावे.
  • त्यानंतर आपला आधार नंबर व मोबाईल नंबर टाकावा.
  • तेथे विचारली जाणारी उपयुक्त कागदपत्रे अपलोड करावीत.
  • आपली ओळख व नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे दस्तावेज-

  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • मनरेगा/एनआरईजीएऐस जॉब कार्ड
  • श्रम कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • सीजीएचएस कार्ड
  • पॅन/ई-पॅन कार्ड

नोट-  अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *