1 नोव्हेंबर पासून शासनाने रेशनकार्ड संदर्भात काही नवीन नियम बदललेले आहेत. या नियमानुसार तांदळासह गव्हाची वाटप कमी झालेले आहे. चला तर मग जाणून घेऊया. आपल्या देशातील नागरिकांसाठी भारत सरकार हे अनेक योजना राबवत असते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यावधी नागरिकांना मिळत असतो.
यातील भरपूर योजना ह्या देशातील गरजूवंत व गरीब नागरिकांसाठी आहे. आपल्या देशामध्ये अनेक लोकांना दोन वेळेच्या जेवणाची समस्या आहे. त्यांच्यासाठी स्वस्त धान्य देण्यात येते. या स्वस्त धान्य दुकानातून त्यांना साखर, तेल तांदळासह गव्हाचे वाटप देखील करण्यात येते.
देशातील गोरगरिबांना रेशनिंग पुरवण्यात येते. आता धान्यवाटपात काही बदल झालेले आहेत. शासनाने कोरोना काळात अतिरिक्त धान्य वाटपाला मंजुरी दिलेली होती. परंतु आता धान्यवाटपसंदर्भात काही बदल करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने राशनकार्ड संदर्भात नियमात बदल केलेले आहेत.
1 नोव्हेंबर पासून हे नियमात बदल झालेले आहेत-
या नियमातील बदलानुसार रेशनकार्ड धारकांना देण्यात येणाऱ्या तांदूळ व गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या आहे. त्यानुसार या दोन्ही धान्यांच्या वाटप समसमान करण्यात येणार आहे. मागील वेळी सरकारने राज्यात आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे यावरती निर्बंध घालण्यात आलेला आहे. आता दोन्ही धान्य समसमान देण्यात येणार आहेत.
तांदळाचे वाटप कमी झाले-
केंद्र शासनाने 1 नोव्हेंबरपासून रेशनकार्ड धारकांसाठी नियमात बदल केलेले आहेत. तांदळाचबरोबर गव्हाच्या वाटपासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. या अगोदर सरकार या योजनेच्या माध्यमातून 3 किलो तांदळाबरोबर 2 किलो गव्हाचे वाटप करत होते. परंतु आता बदललेल्या नियमानुसार तांदळाचे व गव्हाची समसमान वाटप करण्यात येणार आहे.
म्हणजेच आता रेशनकार्डवर 2 किलो ऐवजी अडीच किलो गव्हाचे व 3 किलो ऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. सरकारने अंत्योदय कार्डवर देण्यात येणाऱ्या 35 किलो धान्याच्या वाटपात देखील बदल केलेला आहे. या अगोदर अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गव्हाबरोबर 30 किलो तांदळाचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता 18 किलो तांदळाबरोबर 17 किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. हा नियम 1 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आलेला आहे.
ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ-
केंद्र शासनाने रेशन कार्डधारकांना या अगोदरच ई-केवायसी करण्याचे आदेश दिलेले होते. ई-केवायसी करण्याची या अगोदर अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्चित करण्यात आलेली होती. परंतु अडचणींमुळे अनेक रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करता आलेले नव्हती, म्हणून सरकारने परत एक महिना ही मुदत वाढवली होती.
पण एक नोव्हेंबर रोजी पर्यंत देखील ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची तारीख आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. या काळात ज्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.