आज आपण सदर लेखातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दुधासाठी प्रतिलिटर अनुदान पाच रुपये व सात रुपये देण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या स्थितीला सुरू आहे. जर आपल्याला एसएमएस आला असेल की आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तर ती प्रक्रिया सध्यास्थितीला सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया अनुदानाबद्दलची माहिती.
चालू घडीला दुधाचा पडता भाव पाहता शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधामागे सरासरी 25 ते 28 रुपये एवढा बाजार भाव मिळत आहे. हा मिळणारा बाजार भाव हा खूप कमी आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्यात येईल. अशा प्रकारची सूचना व आश्वासन देण्यात आले होते व त्या अनुषंगाने मागील दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच रुपये व सात रुपये प्रमाणे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.
जर आपणास स्क्रीनवरील एसएमएस आलेला असेल, की आपल्या खात्यावरती सदर रक्कम जमा करण्यात आलेले आहे, तर हे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. अशा माहिती शासनाच्याद्वारे देण्यात आलेली आहे. तसेच जर आपल्याला हे अनुदान केव्हा भेटेल याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण दूध संकलन केंद्र यांच्याकडे जाऊन माहिती घेऊ शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.