रब्बी पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी फक्त एक रुपयांत रब्बी पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून रब्बी हंगामात पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे.

रब्बी पीक विमा योजना-

रब्बी हंगामातही प्रति अर्ज एका रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येत. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छेनुसार या योजनेत सहभागी होता येईल. पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. रब्बी हंगामात वेगवेगळी पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांनी मुदतीच्या अगोदर विमा योजने सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गाव स्तरावर जनजागृती देखील करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज सामूहिक CSC सेवा केंद्रामध्ये भरता येणार –

पीक विमा योजनेत सहभाघी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेचा अर्ज संकेतस्थळावर स्वतः करता येणार आहे किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्याद्वारे देखील अर्ज करता येणार आहे.

मदतीपूर्वी विमा भरावा-

पिकांना विमा संरक्षण असल्यास आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. सामायिक सुविधा केंद्राद्वारे विमा अर्ज करताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया शुल्क म्हणून देणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांने स्वतःचा सातबारा आठ अद्यावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे देखील गरजेचे आहे.

या व्यतिरिक्त चुलकाची अतिरिक्त शुल्काची मागणी जर सामायिक सुविधा केंद्र चालकाने या व्यतिरिक्त जास्तीच्या शुल्काची मागणी केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांकावर करावी. तसेच याबाबत योग्य ती दखल घेऊन ती कार्यवाही केली जाईल असे कळविण्यात आलेले आहे.

सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड-

टोल फ्री क्रमांक- 14599/14447

व्हाट्सअप क्रमांक- 9082698142

तक्रार नोंद क्रमांक- 011-49754923/49754924

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

एक रुपया पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पीक विमा ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विमा कंपनी संपर्क यादीसाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *