लाडकी बहीन योजनेतंर्गत मोठा बदल वेबसाईटवरती करण्यात आलेला आहे. वेबसाईट वरती नवीन दोन ऑप्शन अॅड करण्यात आलेले आहेत. याबद्दलची भरपूरजण चर्चा देखील करत आहेत की पैशांची वसुली होणार आहे का? कारण नवीन ऑप्शन वेबसाईटवरती दिसत आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
वेबसाईटवरती दोन नवीन पर्याय अॅड झालेले आहेत. पहिला पर्याय म्हणजे संजय गांधी योजनेच्या माध्यमातून ज्यांना पैसे मिळतात या संदर्भातील एक ऑप्शन आहे, तो ऑप्शन नक्की काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज स्थिती चेक कशी करावी-
- सर्वात अगोदर तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे.
- त्यानंतर अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्च्या भरून लॉगिन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, त्यामधील पहिला ऑप्शन दिसेल तो म्हणजे केलेला अर्ज व दुसरा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना.
- त्यातील केलेला अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये नाव, अॅप्लिकेशन आयडी, फ़ोटो, अॅप्लिकेशन स्टेटस, संजय गांधी ऑप्शन नवीन अपडेट करण्यात आलेला आहे.
- संजय गांधी हे ऑप्शन नेमकं काय आहे ज्या महिलांना संजय गांधी योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत अशा महिलांना नो ऑप्शन आलेले आहे. ज्या महिलांना काहीच पैसे मिळाले नसतील व त्यांच्यासमोर नो ऑप्शन आलेले असेल तरीदेखील त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
- जर काही महिलांना नो दाखवत आहे व त्यांच्या अकाउंटवर अगोदर पैसे आलेले आहेत तर त्यांचे पैसे वसूल देखील होऊ शकतात. कारण अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसणार आहे.
- ज्या महिलांना यस दाखवत आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- यामध्ये अजून एक ऑप्शन अॅड झालेला आहे त्यामध्ये ॲक्शन बटनमध्ये पैशाचे चिन्ह आहे, तेथे तुम्ही क्लिक केले तर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- यामध्ये तुम्हाला यामध्ये महिलेचे नाव, बेनिफिशिअरी नेम, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, ट्रांनजेक्शन डेट, रिमार्क, अमाऊंट व ट्रांजेक्शन स्टेटस याबद्दल सर्व माहिती दिसणार आहे.
- काही महिलांना आपल्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे येते आहेत हे माहिती नसेल तर त्यांना देखील याद्वारे आता समजणार आहे की आपल्या कोणत्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
WhatsApp Group
Join Now