आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. अखेर बांगलादेशने कांदा आयात शुल्क हटवले आहे. परंतु हा निर्णय फक्त पुढील दोन महिन्यांसाठी घेण्यात आलेला आहे असे पत्रकारवरून दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून बांगलादेशने कांदा आयात शुल्क लावले होते. त्यामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता. शिवाय बाजारभाव देखील मिळत नव्हता.
परंतु बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने आता कांद्याच्या आयातीवरील सीमा शुल्क व नियामक शुल्क पूर्ण मागे घेतलेले आहेत. स्वयंपाक घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे सांगण्यात येत आहे. याबाबत एनबीआरचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल रहमान खान यांनी बुधवारी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे.
15 जानेवारी 2025 पर्यंत हे आया शुरुख मागे घेण्यात आलेले आहे असे देखील सांगितले जात आहे. या अगोदर 31 ऑक्टोबर रोजी बांगलादेश येथील व्यापार व शुल्क आयोगाने कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या 5 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव दिलेला होता. त्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भारतातील व्यापाऱ्यांना कांद्याची निर्यात बांगलादेशात करता येणार आहे.
कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता-
बांगलादेशने आयात शुल्क हटवल्यामुळे येणाऱ्या काळात कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल, अशी अशा निर्माण झालेले आहे. बांगलादेश आता भारतातून अधिक अधिक कांदा आयात करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळण्यास मदत मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच कांदा व्यापाऱ्यांना देखील होणार आहे, असे वाटत आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.