राज्यातील महिलांना लाडकी बहिणी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पात्र महिलांना DBT च्या माधमातून 1500 रुपये देण्यात येतात परंतु आता या योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचार सभेत केलेली आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा देखील केलेल्या आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिणी या योजनेच्या माध्यमातून सर्व माता भगिनींना आतापर्यंत जवळपास 7500 रुपये एवढी रक्कम देण्यात आलेली आहे. आता यापुढील येणारा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे, याबद्दलची अधिकृत माहिती मुख्यमंत्री यांनी भाषणा दरम्यान दिलेली आहे.
याचा अर्थ असा की जर मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकार आले तर सदर योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मिळणाऱ्या रकमे ऐवजी 2100 रुपये पर्यंत करू अशी घोषणा मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे. भविष्यामध्ये कोणाचे सरकार येईल ते जनता ठरवेल परंतु सध्यास्थितीला मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केलेली आहे की या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 1500 रुपये रकमेऐवजी ती रक्क्म 2100 रुपये करण्यात येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.