राज्यात लाडकी बहिणी योजना ही गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या अगोदर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात.
निवडणुकीची आचासंहिता लागण्याच्या अगोदर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार? यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
काय म्हणाले नेमके एकनाथ शिंदे-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदरच त्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
तसेच आता 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर याच नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणलेले आहे.
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण-
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 कोटी पात्र महिलांचे अर्ज आलेले आहेत. तर यातील 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 7500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ही योजना बंद होणार नसून ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे असे देखील आश्वासन आदित्य तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी एक्सवर पोस्ट करत दिलेले आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

