राज्य शासनामार्फत रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु आता राज्य शासनाकडून मुदतवाद देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या रेशनकार्ड धारकांनी अजून देखील ई-केवायसी केलेली नाही अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.
रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची मुदतवाढ मिळाली असली तरी त्याबाबतचे अधिकृत पत्र आमच्याकडे प्राप्त झालेले नाही असे पुरवठा अधिकारी यांनी म्हटले आहे. येत्या 3 दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत हे पत्र प्राप्त होईल. तसेच राज्यातील ज्या रेशनकार्ड लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही अशा धारकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
रेशन कार्ड लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येते परंतु यापासून अनेक लाभार्थी वंचित राहतात. तर काही जण गैरफायदा घेतात. यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकाची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच गरजवंत लाभार्थी निश्चित करता यावे त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे आव्हान करण्यात आलेले आहे.
राशन कार्डला आधार लिंक केल्यास बोगस राशन कार्ड होणार बाद-
सार्वजनिक वितरण प्रणालीमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अन्न व नागरी विभागाकडून आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी बोगस रेशनकार्ड समोर आल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासनाद्वारे राशनकार्डला आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया राहिली आहे अशा ग्राहकांनी दिलेल्या तारखेच्या आगोदर ई-केवायसी करून घ्यावी.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

