आज आपण राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची त्याचबरोबर मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींनी लाडकी बहिणी योजनेसाठी अजून देखील अर्ज भरलेले नाही, अशा लाडक्या बहिणींना आपला अर्ज भरता येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ शासनामार्फत देण्यात आलेली आहे. हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मार्फतच भरण्यात यावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. राहिलेल्या पात्र महिला भागिनींना पुढील चार दिवसात अर्ज भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्यांमध्ये आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्याचे हप्ते सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत. राज्यातील लाडकी बहिणी योजनेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अगोदर सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात लाखो महिलांनी आपले अर्ज केलेले आहेत. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर राज्य शासनाकडून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बहुतेक महिलांच्या बँक खात्यात 5 हप्ते म्हणजे 7500 रुपये जमा झाले आहेत. आता उरलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. परंतु त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

