पीएम किसान योजनेच्या नियमात बदल?

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वापुर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक व योग्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. तसेच राज्य सरकारने ही नमो सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्यात येतात.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व 2019 च्या अगोदर नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलाला लाभ देण्यात येतो. परंतु काही पती-पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर असणारे त्याचबरोबर माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत आहेत असे दिसून आले आहे. चला तर मग जाणून घेऊया केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे.

हे आहेत नवीन नियम-

  • नवीन नियमानुसार 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ असा की 2019 च्या अगोदर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • तसेच या योजनेचा अर्ज करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे.
  • जर कुटुंबात जर कोणाचे निधन झाले असल्यास व वारसा हक्काने ती जमीन मिळाली असेल तर फक्त त्या एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेचा सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असलेल्याकिंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना घेता येणार नाही.

सदर योजनेच्या नियमात कोणत्या कारणामुळे बदल करण्यात आले आहेत-

या योजनेच्या नियमात बदल करण्यामागचे सरकारचे उद्दिष्ट ही योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आहे. त्याचबरोबर अनेकदा असे देखील दिसून आले आहे की पात्र नसलेले व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारने या योजनेच्या  नियमांमध्ये बदल केले आहेत.

तसेच पीएम किसान या योजनेच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा म्हणजेच शेती नसताना देखील अनेकांनी सुरुवातीपासून नोंदणी केलेली आहे. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आजही मिळत आहे. त्याचबरोबर भरपूर जणांनी पती-पत्नी व काही घरातील मुलांचीसुद्धा नोंदणी केलेली आहे. त्यामुळे एकाच घरातील तीन ते चार व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

सदर योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

  • लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा उतारा.
  • अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी झालेला असेल तर एकच फेरफार.
  • फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल तर अगोदरचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार.
  • पती,पत्नी व मुलांचे आधार कार्ड
  • 12 अंकी रेशन कार्ड

सदर योजनेचे महत्त्व काय आहे?-

ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी आवश्यक तो खर्च करू शकतात.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *