आज म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसान भरपाई ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष कार्यालयाद्वारे सांगितली आहे. त्याचबरोबर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर व जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण साधारण 7621 कोटी रुपयांची विमान नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. पीकविमा ही योजना राज्यात बीड पॅटर्ननुसार राबवण्यात येते. याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी पीकविमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे, त्या ठिकाणी 110% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.
यानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर 7621 कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये 5469 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. तर उरलेल्या शिल्लक नुकसान भरपाई पैकी रु.1927 कोटीची नुकसान भरपाई वाटप हे प्रलंबित होते. तसेच सर्वात जास्त नुकसान भरपाई ही एकट्या नगर जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते.
यामुळे स्वतंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. या दरम्यानच्या रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरबरोबर 6 जिल्ह्यांची प्रलंबित असलेल्या सुमारे 1927.52 कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR काढण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे संघटनेद्वारे सांगण्यात आले आहे.
खात्यामध्ये पैसे आज पासून जमा होणार-
या प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक 656 कोटी रुपये, जळगाव 470 कोटी रुपये, अहमदनगर 713 कोटी रुपये, सोलापूर 2.66 कोटी रुपये, सातारा 27.73 कोटी रुपये व चंद्रपूर 58.90 कोटी रुपये प्रलंबित होते. ही संपूर्ण प्रलंबित रक्कम रुपये 1927 कोटी एवढी मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम 10 ऑक्टोबर नंतर जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाद्वारे दिली गेली आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.