तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार

राज्यामधील खरीप-2024 हंगामासाठी तलाठ्याच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी ही 26 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे. या यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झालेली होती व त्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही.

त्यामुळे या नोंदी मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना ई- पीकपाहणीसाठी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीकपाहणी 23 सप्टेंबरला संपलेली आहे. परंतु आता तलाठ्याच्या स्तरावरील ई-पीकपाहणीची कामे जलदपणे सुरू आहेत असे देखील महसूल विभागाद्वारे म्हटले आहे. यंदाच्या खरीप पिकांसाठी दोन प्रकारची ई-पिकपाहणी केली जात आहे.

केंद्र सरकारच्याद्वारे सुरू असलेली ई-पीकपाहणी म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे(डीसेएस) अजून 23 ऑक्टोबरपर्यंत चालू असणारा आहे. ही ई-पीकपाहणी 2800 गावांपुरतीच मर्यादित असणार आहे. राज्यातील इतर 41 हजारांहून अधिक गावांमध्ये राज्य शासनाची ई-पीकपाहणी (नॉन डीसीएस) तलाठ्यांच्या पातळीवर 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्यात आलेली आहे. तसेच शेतकरी व तलाठ्याच्या माध्यमातून आतापर्यंत 1.20 कोटी हेक्‍टरची ई-पीकपाहणी पूर्ण झालेली आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत वाटपासाठी ई-पीकपाहणीची अट टाकण्यात आली होती. यामुळे यंदा ई-पीक पाहणीचा मुद्दा राज्यभर चर्चेला आला. तसेच ई-पीकपाहणीची समस्या येत असल्याने ही अट काढून टाकण्याची मागणी देखील काही भागातून झाली. त्यामुळे ई-पीकपाहणीची समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने सर्व्हरची क्षमता यंदा वाढवली आहे असे देखील म्हटले जात आहे.

ई-पीकपाहणीची नोंद दुरुस्तीचे अधिकार कोणाला-

भ्रमणध्वनी किंवा कोणत्याही प्रकारे झालेल्या ई-पीकपाहणीची नोंद दुरुस्त करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी सर्वात अगोदर तलाठ्याकडे अर्ज करावा. तसेच तलाठ्यांच्या स्तरावर झालेल्या नोंदीमधील दुरुस्तीचे अधिका मंडळ अधिकाऱ्याला आहे. परंतु दुरुस्तीपूर्वी या अधिकाऱ्याने गावाला भेट द्यावी व पंचनामा करणे गरजेचा आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *