आजच्या काळात आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणत्याही लहान किंवा मोठ्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. अनेक लोकांकडे जाड कागदावरील लॅमिनेटेड केलेले आधार कार्ड आहे. परंतु असे जे आधार कार्ड आहे ते खूप लवकर खराब होतात.जर तुम्हाला चांगले व तुमच्या पॅन कार्डसारखे दिसणारे आधार कार्ड घ्यायचे असेल तर तुम्ही यूआयडीएआयच्या वेबसाईटवरून पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
पीव्हीसी आधार कार्ड पन्नास रुपयांना मिळणार-
पीव्हीसी आधार कार्ड यूआयडीएआय लोकांना फक्त 50 रुपयात देत आहे. यासाठी तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप वरून यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता. हे आधार कार्ड मिळवण्यासाठी फक्त 50 रुपये खर्च करावे लागतात. या पन्नास रुपयांमध्ये स्पीड पोस्ट शुल्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. एक्स पोस्टमध्ये यूआयडीएआयने लोकांना पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिलेला आहे.
पीव्हीसी आधार कार्ड कसे मागवावे?
- पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी सर्वात अगोदर यूआयडीएआयच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये जावे व ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावे.
- आता आपला आधार कार्ड नंबर व कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर सेंड ओटीपी यावर क्लिक करावे.
- नंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकावा.
- त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पीव्हीसी आधार कार्डची एक कॉपी येईल. त्यातील आपली सर्व माहिती तपासून पहावी व आपले पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करावे.
- नंतर तुम्हाला 50 रुपये भरावे लागतील व त्यानंतर तुमच्या रिक्वेस्टवर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
- ऑर्डर केल्यानंतर तुमचे पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी 15 दिवसांच्या आत किंवा 15 दिवसांच्या नंतर येईल. पीव्हीसी आधार कार्ड अनेक सिक्युरिटी फीचर्सबरोबर येते.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.