अन्नपूर्णा योजना चालू; वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळणार, शासन निर्णय जाहीर.

राज्य शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोणती आहे ही योजना, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, अटी व शर्ती तसेच पात्रता याबद्दलची माहिती.

राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्याचबरोबर राज्य शासनाने एक नवीन योजना म्हणजेच अन्नपूर्णा योजना ही सुरू केलेली आहे.

सदर योजनेची पात्रता

  • ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळतो त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
  • तसेच ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या अटी व शर्ती

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर पुस्तक हे त्या महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे.
  • एलपीजी गॅस सिलेंडर जर घरातील पुरुषाच्या नावावर असेल तर आपण ते एलपीजी गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर ट्रान्सफर केल्यास त्या महिलांना याचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
  • जर एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी केलेली नसेल, तर लगेच आपल्या गॅस वितरकाकडे जाऊन ई-केवायसी करून घ्यावी.

घरातील पुरुषाच्या नावे सिलेंडर असेल तर महिलेच्या नावे ट्रान्सफर कसा करावा

जर घरातील पुरुषाच्या नावावर एलपीजी गॅस सिलेंडर असेल तर तो महिलेच्या नावावर करायचा असेल तर आपण एलपीजी गॅस एजन्सीच्या ऑफिसला जाऊन तिथे एक फॉर्म भरून घरातील महिलेच्या नावावर एलपीजी गॅस सिलेंडर करू शकता. तसेच त्या महिलांना थेट अन्नपूर्णा योजनेचा लाभ  मिळणार आहे.

सदर योजनेचा लाभ कसा देण्यात येणार आहे-

राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे सिलेंडर खरेदी करतो व त्याचे संपूर्ण पैसे देतो त्याप्रमाणेच आपल्याला संपूर्ण प्रक्रिया करायची आहे.

तसेच संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर आपल्याला आपण एलपीजी गॅस सिलेंडरसाठी जेवढी  रक्कम भरलेली आहे तेवढी रक्कम थेट त्या महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक सिलेंडर मागे सबसिडी मिळते. त्यांना सबसिडी व उरलेली गॅसची रक्कम देण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून किती रक्कम मिळणार-

  • जर उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मिळालेला असेल तर अशा महिलेस 830 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.
  • जर उज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळत नसेल तर अशा महिलांच्या बँक खात्यात 530 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *