लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 था हप्ता जमा होण्यास सुरुवात.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती की महिलांना आचारसंहितेच्या अगोदर ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ज्या महिलांना अजून देखील 1500 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांनी काय करावे?, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाले नाही त्यांनी काय करावे?, व ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमात होणार आहे? याबद्दलची माहिती.

ज्या महिलांना 1500 रुपये मिळाले नाहीत त्यांनी काय करावे?-

महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे परंतु अजून देखील तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा महिला भगिनींना काळजी करण्याची गरज नाही. पुढील दोन दिवसांमध्ये ही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

ज्या महिला भगिनींना एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी काय करावे?-

ज्या महिला भगिनींनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला आहे व त्यांचा फॉर्म Approved देखील आहे. परंतु त्या महिला भगिनींना एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांनी आपल्या आधार कार्डला बँक Seeding आहे की नाही ते चेक करावे.

बँक Seeding असूनही पैसे आले नाहीत अशा महिला भगिनींनी काय करावे?-

ज्या महिला भगिनींना बँक Seeding असून देखील एकही रुपया मिळालेला नाही अशा महिला भगिनींना काळजी करण्याची गरज नाही. कारण येणाऱ्या ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या 4 थ्या हप्त्याबरोबर मागील 4500 रुपये व पुढील 3000 रुपये असे मिळून एकूण 7500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.

ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4 था हप्ता जमा झाला नाही त्यांनी काय करावे-

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील 4 था हप्ता काही महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही. कारण भाऊबीजपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील.

या महिन्यामध्ये कधीही तुम्हाला हे पैसे मिळतील. एकूण ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन्ही मिळून 3000 रुपये दिले जाणार आहेत. आचारसंहिता लागल्यामुळे सर्व काम ठप्प होईल, त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे एवढ्या लवकर देण्याचे काम सरकार करत आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना काही दिवसात पैसे मिळतील. काही काळजी करू नका.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *