सरकारी दस्तावेज किंवा साधी नोटरी करण्यासाठी सर्वसाधारणपणे नागरिकांना 100 रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपर वरून दस्तावेज तयार करता येत होते. परंतु नागरिकांचा दस्तावेज 100 व 200 रुपयांचा स्टॅम पेपर बंद करण्यात आलेला आहे. कारण आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
महसूल विभागाकडून आता फक्त 500 रुपयांचे स्टॅम्प जारी केले जाणार आहेत कारण हा निर्णय राज्य शासनाने मुद्रांक शुल्क वाढवल्यामुळे घेण्यात आला आहे. राज्य शासनाने हा निर्णय सरकारचा महसूल वाढविण्यासाठी घेतलेला आहे अशी माहिती समोर आली आहे. 100 ते 200 रुपयांच्या स्टॅम्पवरती तहसील किंवा महसूल कार्यालयात स्टॅम्प केले जातात. वैयक्तिक कारणांसाठी, बँक व विविध कामांसाठी केल्या जाणारी प्रतिज्ञापत्रे, साठेखतानंतरचे खरेदीखत व हक्क सोडपत्र यासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.
प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर परत खरेदीखत करताना हे सर्व शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर करण्यात येत होते. परंतु त्यासाठी आता शंभर रुपयांऐवजी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरले जाणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
या कामासाठी लागतात स्टॅम्प?-
सामंजस्य करार, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्र., पतसंस्था कामी हमीपत्र, प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, लग्न नोंदणी, घर भाडे करार, वाहन खरेदी विक्री करार, जमीन व्यवहार विक्रीचे प्रतिज्ञापत्र, बँक, न्यायालय कामकाजासाठी राज्यात लाखो मुद्रांकांची विक्री करण्यात येते. आता सामान्यां नागरिकांना चार पट पैसे मोजावे लागणार आहेत कारण या अगोदर स्टॅम्प 100 व 200 रुपयाला मिळत होता. परंतु आता तो 500 रुपयांना मिळाल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यासाठी 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.