नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेच्या हप्त्याचे वितरण एकाच दिवशी होणार!

पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या योजनांचे ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील 18 वा व 5 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10  वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील होणाऱ्या निधी वितरण समारंभामध्ये केले जाणार आहे. या समारंभासाठी राज्यातील सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबास रु. 2000/- प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रु. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यावर जमा केले जातात. तसेच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रु. 32000 कोटींचा लाभ जमा करण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2023-24 पासून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जात आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्त्या वितरणाच्या वेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रु. 6949.68 एवढी रक्कम देण्यात आली आहे.

जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसरा क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे. तसेच केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रु. 1900 कोटीहून अधिक रकमेचा लाभ त्याच बरोबर राज्याच्या योजनेमधून रु. 2000 कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट डीबीटी हस्तरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून रु. 2000/-  तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून रु. 2000/- असे एकूण 4000/- रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी आवाहन केले आहे की पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात या लिंक आधारे सर्वांनी सहभागी व्हावे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *