सोमवारी (ता.30) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन-पोषणासाठी प्रति दिवस, प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशी गाईंचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना राज्यमाता गोमाता दर्जा देण्याचा शासन आदेशही जाहीर करण्यात जाहीर करण्यात आलेला आहे.
2019 मधील 20व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या 46 लाख 13 हजार 632 इतकी कमी झाल्याचे दिसून आले आहे. ही संख्या 19व्या पशूगणनेशी तुलना करता 20.69 टक्क्यांनी कमी झाले आहे. म्हणून गोशाळांना देशी गाईच्या पालन-पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे.
गोशाळांचे उत्पन्न हे कमी असते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही म्हणून त्यांना बळकट करण्यासाठी अनुदान द्यावे असा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्ध विकास व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. ही योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळा पडताळणी समिती असेल.
गाय आता राज्यमाता-गोमाता-
महाराष्ट्रात असलेल्या देवणी, लालकंधारी, खिलार, डांगी, गवळाऊ आदी देशी गायी आहेत. या गाईंच्या संख्येत घट होत चालली आहे. परंतु वैदिक काळापासून त्यांचे असलेले स्थान, दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायीचे शेण व गोमुत्राचे सेंद्रिय पद्धतीने असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन यापुढे देशी गाईंना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाद्वारे सोमवारी घेण्यात आलेला आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.