राज्य शासनाच्या मार्फत चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना अजूनही एकही रुपया मिळाले नाही त्यांनी दोन महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहेत. तसेच ज्या महिलांना या अगोदर दोन हप्ते मिळालेले आहेत व त्यांना अजून देखील तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी काय करावे ते आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरले होते, त्यांना दोन हप्ते पैसे एकूण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. तसेच ज्या महिलांनी पहिले दोन हप्ते मिळाल्यानंतर फॉर्म भरले आहेत, त्यांना आता थेट 4500 रुपये म्हणजे तीन महिन्याचे एकूण रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. जर अजून देखील ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली नसेल तर खालील काम करावे.
लगेच करा हे काम-
- ज्या महिला भगिनींच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही त्यांनी सर्वात अगोदर आपल्या बँक खात्याला आधार Seeding आहे की नाही ते पाहावे.
- ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत, त्यांनी कोणतेही काम करण्याची गरज नाही कारण फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्यास उशिर होत आहे.
ज्या महिला भगिनींचे आधार Seeding आहे परंतु पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे-
जर आधार कार्डला बँक Seeding असेल व अजून देखील अशा महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही. कारण फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्यास उशीर होत आहे. तरी कोणत्याही महिलांना काळजी करण्याची गरज नाही. एक तारखेपर्यंत म्हणजेच आज आधार Seeding असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

