केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये 20 टक्के कपात; तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्य देखील हटवले गेले.

केंद्र सरकारने कांद्यावरील 550 डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य हटवले आहे. तसेच निर्यात शुल्कामध्ये 20% कपात करीत कांदा उत्पादकांना दिलासा दिलेला आहे. शुक्रवारी वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीने एक अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून, तसेच निर्यात शुल्कातही निम्मे कमी करून म्हणजेच 20 टक्क्यांवर आणल्याने निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यातीची संधी मिळणार आहे.

 शेतकऱ्यांना नाफेड व एनसीसीएफचा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे भाव पडण्याची भीती वाटत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. याचे कारण असेही होते की, पाकिस्तान व अफगाणिस्तानचा कांदा हा भारतीय कांद्यापेक्षा कमी दरात जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती.यामुळे भारतीय कांद्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, असे म्हटले जात आहे.

काय होणार याचा फायदा-

कांदा निर्यात करणे सोपे झाले आहे तसेच निर्यातीत वाढ देखील होईल. कांद्याला चांगला भाव मिळेल. दिवाळीनंतर नवीन लाल व रांगडा कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव हे टिकून राहण्याची शक्यता आहे.

बासमती तांदळावरील निर्बंध देखील हटविले आहेत?-

केंद्र सरकारने बासमती तांदळावरील देखील निर्यात मूल्यावरील मर्यादा हटवली आहे. बासमती तांदळावर 950 डॉलर प्रतिटन एवढी किमान मर्यादा होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये निर्यात मुल्य 1,200 डॉलर प्रति टनावरून घटवून 950 डॉलरवर आणले होते. तसेच भारतातून गेल्या अर्थिक वर्षात 5.9 अब्ज डॉलर मूल्याचे बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *