नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणास बुधवारपर्यंत मुदतवाढ.

राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त अभियानांतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रामाणिक करण्यास 18 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे. राज्यातील अजूनही 16 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणीकरण शिल्लक असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहे.

जे शेतकरी नियमित पीक कर्ज फेड करतात त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. परंतु काही शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रामाणिकरण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.

तरीदेखील अजूनही 16 हजा 345 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने आता पुन्हा 18 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या अगोदर यासाठी 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील या काळात 33 हजार 166 शेतकऱ्यांपैकी फक्त 16 हजार 821 शेतकऱ्यांनीच आधार प्रामाणिकरण केले आहे.

आधार प्रामाणिकरण न केलेले जिल्हानिहाय शेतकरी-

पुणे-651, ठाणे-64, हिंगोली-127, पालघर-140, लातूर-993, धाराशिव-1958, रायगड-174, बीड-226, रत्नागिरी-637, नांदेड-872, सिंधुदुर्ग-224, अमरावती-234, नाशिक-484, अकोला-119, धुळे-0229, वाशीम-161, नंदुरबार-145, बुलडाणा-100, जळगाव-1053, यवतमाळ-1303, नगर-706, नागपूर-483, सोलापूर-260, वर्धा-209, कोल्हापूर-1427, चंद्रपूर-324, सांगली-446, भंडारा-681, सातारा-537, गडचिरोली-175, संभाजीनगर-394, गोंदिया-247, जालना-430, एकूण-16,345

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *