एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम.

आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देणारी एक योजना आहे. शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्यमान कार्ड तयार केले जाते व त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करता येतात. शासनाच्या मार्फत दरवर्षी हे संरक्षण दिले जाते व हा खर्च उचलला जातो.

बुधवारी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 वर्षावरील सर्व वृद्धांना आयुष्यमान योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच उत्पन्नाची यासाठी कोणतीही अट नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ साडेचार कोटी कुटुंब व 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी या अगोदर घेत आहेत. त्यांना 5 लाखांचे कव्हर मिळणार आहे.

34 कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड बनले गेले आहेत-

सरकारी आकड्याद्वारे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या आयुष्यमान कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 30 जून 2024 पर्यंत याचा आकडा 34.7 कोटींहून अधिक झाला होता. या कालावधीमध्ये 1 लाख कोटी रुपयापर्यंतच्या 7.37 कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी देशभरातील 29 हजाराहून अधिक सूचीबध्द रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय-

बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा करताना सांगितले की आयुष्यमान भारत योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्यापुढे बोलताना त्या म्हणाल्या की आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. या निर्णयाचा हेतू हा 4.5 कोटी कुटुंबातील 6 कोटी वयोवृद्ध नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळावा हा आहे.

या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना एक नवीन व वेगळे कार्ड जारी करण्यात येणार आहे. जर जेष्ठ नागरिक हे सध्या कोणत्याही आरोग्य योजनेच्या माध्यमातून समाविष्ट असल्यास, त्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड मध्ये स्वीच करण्याचा पर्याय असणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

एका कुटुंबामधील किती लोक बनवू शकतात आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड-

शासनाकडून कोणतीही ज्यावेळी योजना लॉन्च केली जाते, त्यावेळी त्यासोबत योजनेसाठी पात्रतेचे सर्व निकषही जाहीर केले जातात. तुम्हाला माहिती आहे का? एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड काढण्यास पात्र असतील? गरजूंना सुविधा मिळावी यासाठी या शासकीय योजनेत अशी कोणतीही मर्यादा घातली गेलेली नाही. याचा अर्थ असा की एका कुटुंबामध्ये जितके लोक आहेत तितके लोक आयुष्यमान कार्ड बनवू शकतात. परंतु कुटुंबामधील सर्व सदस्य या योजनेसाठी पात्र असायला ह्वेत.

कोणाला घेता येईल योजनेचा लाभ?-

या योजनेच्या बाबतीतील सरकारने सांगितलेल्या पात्रतेच्या निकषांबद्दल बोलायचे म्हटले तर ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीतील निराधार किंवा अपंग लोक किंवा जे असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा रोजंदारी मंजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करतात ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तुम्हाला पात्रतेची माहिती ऑनलाईन मिळू शकते.

पात्रतेची माहिती ऑनलाईन कशी मिळवावी-

  • सर्वात अगोदर pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘Am I Eligible’ या ऑप्शनवर क्लिक करावे.
  • तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून सब्मिट बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो तिथे टाकावा.
  • राशन कार्ड नंबर टाकावा
  • आता स्क्रीनवर तुमचे राज्य निवडावे, त्यानंतर मोबाईल नंबर व राशन कार्ड नंबर टाकावा.
  • आता तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स येतील. त्यामध्ये तुम्ही समजेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की अपात्र आहात.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *