सदर योजनेची माहिती-
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम हा शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. उमेदवारांकडून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची 6 महिन्यासाठी निवड करण्यात येणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
सदर योजनेसाठी उमेदवार पात्रतेचे निकष-
- 18 ते 35 वर्ष
- कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान गरजेचे
- महाराष्ट्र अधिवासी असणे आवश्यक
- बँक खाते आधार क्रमांक संलग्न असणे गरजेचे
सदर योजनेच्या नियुक्तीवेळी सादर करावी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- पदवी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
सदर योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी-
मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा 7 ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज कोठे करावा?-
मुख्यमंत्री योजनादूतसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा https://www.mahayojanadoot.org/ या अधिकृत संकेतस्थळावर करावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

