आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आपले सेवा केंद्रातून भरता येणार नाही. तर फक्त अंगणवाडी सेविकांना नवीन अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने या संदर्भातील जीआर देखील काढला आहे. त्यामुळे आपले सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आज पासून रद्द-
- आशा सेविका
- सेतू सेवा केंद्र
- आपले सरकार सेवा केंद्र
- समूह संघटक
- सीआरपी अंतर्गत शहरी-ग्रामीण लाईव्हलिहूड मशीन
- मदत कक्ष प्रमुख
- सिटी मिशन मॅनेजर
- ग्राम सेवक
शासनाने का घेतला हा निर्णय?-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये सांगण्यात आले आहे की यापुढील अर्ज हे फक्त अंगणवाडी सेविकांद्वारे भरता येणार आहेत. या योजनेसाठी नोंदणीच काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे शासनाच्या शासन निर्णयात म्हटले आहे.
या योजनेच्या माध्यमातून या अगोदर अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली होती. परंतु आता या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित असल्यामुळे फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारे अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे देखील शासन निर्णयात म्हटले आहे.
मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्या अर्जांपैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना फक्त अंगणवाडी सेवेकडूनच मंजुरी देण्यात येणार आहे.
सदर योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले आहेत-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै व ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटीचा लाभ देण्यात आलेल्या आहे. या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.
नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.