आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करून विहिरी, शेततळे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, वीज जोडणी आदीसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
- विहिर अनुदान-
या योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी या अगोदर अडीच लाख रुपये देण्यात येत होते. परंतु आता विहिरीसाठी चार लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजारावरून एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नवीन विहिरी बाबत 12 मीटर खोलीची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे
- इनवेल बोअरिंग-
तसेच इनवेल बोअरिंगसाठी 20 हजारांवरून 40 हजार यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रुपये, परसबागेकरीता 5 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
- शेततळे-
शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाखांपैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.
- तुषार सिंचन व ठिबक सिंचन-
तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचनाचा संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.
अशाप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पेक्षा जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.