आज आपण सदर लेखांतून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरलेल्या आहेत व त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये देखील जमा केले जाणार आहेत. तसेच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी एक दिलासा देणारी बातमी सांगितली आहे.
त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतचे महत्त्वाची घोषणा पोस्टद्वारे शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी राज्य शासनाचा GR शेअर केला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत होती. अनेक महिलांनी त्यानुसार ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले. तसेच अर्ज स्वीकारण्याची गती देखील या महिन्यात वाढवण्यात आली होती. त्यामुळे कोट्यावधी महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत.
या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे अर्ज हे भरले नाही गेलेत. यामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी राज्य सरकारने या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी वाढवला आहे. आता सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे असे आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच या योजनेसाठी नाव नोंदणी ही सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला भगिनींनी अजूनही नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असे आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारचा पोस्टमध्ये GR देखील जोडला आहे.
सदर योजनेबाबतीतील नवीन शासन निर्णय काय आहे?-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेच्या माध्यमातून नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच या योजनेच्या नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे देखील GR मध्ये नमूद करण्यात आले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.