वीज ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी बंद झालेले आहेत. अशा लाखो ग्राहकांसाठी महावितरणाने मोठी दिलासादायक घोषणा केलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या बद्द्लची सविस्तर माहिती.

अभया योजनेच्या माध्यमातून राज्यातील 38 लाख घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याजव विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या अभय योजनेचा कालावधी असणार आहे. या कालावधीमध्ये थकबाकीदार ग्राहक मूळ बिलाची रक्कम विविध हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी भरून वीज कनेक्शन पुन्हा सुरू करू शकणार आहेत.

सदर योजनेचे वैशिष्ट्य-

  • थकबाकी माफी: ग्राहकांचे थकबाकीवरील एकूण 1 हजार 788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत.
  • हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा: ग्राहकांना आपल्या मूळ विज बिलाच्या रक्कमेच्या 30% रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरतात येणार आहे.
  • एकरकमी रक्कम भरल्यास सवलत: जर घरगुती व व्यावसायिक ग्राहकांनी एकरकमी रक्कम भरल्यास त्यांना 10% तर उच्चदाब ग्राहक यांना 5% सवलत देण्यात येणार आहे.
  • नवीन कनेक्शन: जुना पत्ता व पुरावे सादर करून नवीन नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांनी कारवाई पासून दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितनाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केले आहे.

ग्राहकांना असा घेता येईल लाभ-

वीज ग्राहकांना https://www.mahadiscom.in/wss/wss  या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने महावितरणाच्या या अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणाच्या मोबाईल ॲपवरूनही अभय योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेता येणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर त्या वीज ग्राहकाला परत एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येणार आहे. त्याचबरोबर त्याच पत्त्याचा योग्य पुरावा सादर करून नवीन नावाने वीज कनेक्शन घेण्याची ही सुविधा असणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *