साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठवली गेली.

आज आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज पासून केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट येणार होती. त्यामुळे मागील वर्षी देशातील संभाव्य साखर संकट टाळण्यासाठी उसाचा रस व साखरेचा अर्कापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखान्यांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

इथेनॉल बंदीचा निर्णय हा साखर उत्पादन कमी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने घेतला होता. परंतु या निर्णयाचा मोठा फटका कारखान्यांना बसला व त्यांचे खेळते भांडवल कमी झाले. तसेच याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला. दोन वर्षा अगोदर तर राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. परंतु त्यानंतर राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप क्षमता वाढवली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

परंतु मागील वर्षी दुष्काळामुळे उसाच्या उत्पन्नात घट येणार होती. देशातील संभाव्य संकट टाळण्यासाठी उसाचा रस व साखरेच्या अर्कापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे याचा परिणाम उसाच्या FRP वर झाला. त्यामुळे कारखानदारांसोबतच उस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. जे कारखाने इथेनॉलची निर्मिती करायचे अशा कारखान्यांना कर्जही दिले जाऊ नये असा निर्णय देखील राज्य सहकारी बँकांनी घेतला.

परंतु आता इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे. आता साखर कारखान्यांना B मोलैसीस, उसाचा रस व सिरप पासून पूर्ण क्षमतेने निर्मिती करता येणार आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखानदारांसाठी व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इथेनॉल निर्मितीवर डिसेंबर 2023 मध्ये बंदी घालण्यात आली होती. परंतु आता जवळपास नऊ महिन्यानंतर ही बंदी उठवण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ ही बंदी उठवली गेली पाहिजे अशी मागणी करत होती. त्या प्रयत्नांना आता यश आलेले आहे. महाराष्ट्रातील 112 कारखान्यांमध्ये सध्या स्थितीला इथेनॉल निर्मिती केली जात आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे आगामी काळात पेट्रोलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे या निर्णयाचा फायदा भविष्यात सर्वसामान्यांना सुद्धा होणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *