कापूस व सोयाबीन पिकांचे अनुदान मिळाले आहे की नाही मोबाईलद्वारे ऑनलाईन कसे चेक करावे.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीचे अट रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किंमतीच्या घसरनीमुळे शेतकऱ्यांना याचे नुकसान सोसावे लागले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपण हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे.

चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहयाचे स्टेटस ऑनलाईन चेक कसे करता येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणारे अनुदान मिळाले आहे की नाही ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करावे-

  • कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यांचे स्टेटस पाहण्यासाठी सर्वात अगोदर https://scagridbt.mahait.org/ या वेबसाईटवर क्लिक करावे.
  • सोयाबीन व कापूस अनुदान वेबसाईट ओपन झाल्यानंतर Disbursement Status या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर Disbursement Status पेज मध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करावे.
  • त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसाह्याचे स्टेटस याविषयीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *