माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पात्र अर्जदार महिलांना या दिवशी मिळणार वितरणाचा दुसरा टप्पा?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आताच 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरणाचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींचे ई-केवायसी प्रलंबित अर्ज होते व ज्या महिलांचे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा हा 29, 30 व 31 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीचा साह्याने पाठवला जाणार आहेत.

आज काही महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खाते आधार सिडिंग करून ई-केवायसी प्रक्रिया पटकन पूर्ण करावी असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आलेले आहे. राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यापैकी ज्यांचे आधार सिडिंग नसलेल्या लाभार्थी महिलांनी बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आधार सिडिंग करण्याबाबत आवाह्न देखील करण्यात आलेले आहे.

तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजूरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. आधार सिडिंग करून ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अजून जमा झालेले नाही. अशा लाभार्थी महिलांनी आधार सिडिंग करून ई-केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात 3 हजार रुपये रक्कम जमा होणार आहे.

ज्या महिलांचे आधार सिडिंग करून ई-केवायसी प्रलंबित आहे अशा महिलांना शासनामार्फत संदेश देखील पाठवण्यात आलेले आहेत. त्यांनी तातडीने आपली खाती आधार सिडिंग करून ई- केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे,. लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहेत त्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये पाठवले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने नारीशक्ती अ‍ॅप मधून अर्ज दाखल करून घेतले होते. ज्या महिलांच्या खात्या सरकारने पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. परंतु राज्य सरकारने बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाची कपात न करता ते महिलांना द्यावीत असे आदेश दिलेले आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *