प्रोत्साहनपर लाभासाठी आधार प्रामाणीकरणाची 7 सप्टेंबरपर्यंत संधी!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरणाऱ्या पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रामाणिककरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रामाणिकरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

तसेच देण्यात आलेल्या मुदतीत आधार प्रामाणिक करून घ्यावे, असे आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. या योजनेच्या लाभास पात्र शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. आधार प्रामाणिकरण केल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना याबाबतीतील महा-आयटी मार्फत एसएमएस देखील देण्यात आलेला आहे.

या योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यानां सर्व बँकांनी देखील व्यक्तीशः कळवणे गरजेचे आहे. 7 सप्टेंबरनंतर आधार प्रामाणिककरण करण्याची सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 7 सप्टेंबरच्या अगोदर आधार प्रामाणीकरण करून घ्यावे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *