जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खात्यात 3000 हजार रुपये जमा झाले नसतील तर आजच मोबाईलद्वारे करा हे काम.

आज आपण सदर लेखातून महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यापासून म्हणजेच 14 ऑगस्ट पासूनच्या सायंकाळपासून खात्यावर 3 हजार रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत जवळपास 90 लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळालेला आहे.

परंतु काही कारणामुळे बऱ्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याचे आढळले आहे. याचे कारण बँक अकाउंटला आधार लिंक नसल्याचे दिसून येत आहे. ज्या महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत त्या घरी बसल्या देखील मोबाईलद्वारे सुद्धा अकाउंटला आधार कार्ड लिंक करू शकतात. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही कसे चेक करावे?-

  • तुमचा आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर माय आधार या पर्यायावर जायचे आहे.
  • आता त्यामध्ये लॉगिन करून तुमचा आधार क्रमांक व कॅपच्या कोड टाकायचा आहे.
  • नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी दिलेल्या रकान्यात भरायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Bank Seeding Status या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँकेचे नाव, तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.
  • जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेचे नाव दिसले तर तुमचे बँक आधार सोबत लिंक आहे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास काय करावे?-

  • सर्वात अगोदर तुम्हाला NPCI या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • त्यानंतर Consumer या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • आता भारत आधार सीडींग या ऑप्शनवर जायचे आहे.
  • नंतर भारत आधार सीडिंग या ऑप्शन वर जायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व Request For Aadhar Seeding या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला ज्या बँकेशी खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडायचे आहे व त्यानंतर खाली दिलेल्या fresh seeding या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे.
  • मग टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारायच्या आहेत व कॅपचा कोड भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *