आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, परंतु सरकार या अनुदानाचे वाटप नेमके कधी करणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. म्हणजेच कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती.
कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी थोडासा उशीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतीतील दोन कारणे देण्यात आलेली आहेत. एक म्हणजे 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणीची नोंदणी वरून उडालेला गोंधळ व दुसरा म्हणजे 31 ऑगस्ट पासून सोयाबीन व कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी देखील चर्चा पाहायला मिळत आहे. सोयाबीन व कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणी बाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे.
राज्य सरकारने 2024 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये किमान एक हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी जास्तीत जास्त 10 हजार रुपये व 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट 1 हजार रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणे किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी यासाठी पात्र असणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र शेतकऱ्याकडून भरून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आधार वरील माहिती वापरण्यासंबंधी संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचे आहे. तर सामायिक खातेदारांना एक ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचे आहे. जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदाराच्या नावावर जमा करण्यात येईल.
पात्र शेतकऱ्यांची संख्या?-
कृषी विभागाच्या माहितीनुसार 2023 च्या खरीप हंगामात ही पीक पाहणी केलेली राज्यातील 90 लाख सोयाबीन व कापूस उत्पादक या योजनेला पात्र ठरलेले आहेत. यामध्ये 58 लाख शेतकरी हे सोयाबीन उत्पादक आहेत तर 32 लाख शेतकरी हे कापूस उत्पादक आहेत. यामध्ये 75 लाख खातेदार आहेत.
तर 15 लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार संमती पत्र व सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार म्हणजेच 21 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे कृषी विभागाच्या मार्फत सांगण्यात आले आहे.
अनुदान बँक खात्यात कधी जमा होणार?-
थेट लाभ हस्तांतरणासाठी राज्य सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी आयुक्तांच्या नावाने खाते उघडण्यासाठी मान्यता दिलेली आहे. म्हणजेच या योजनेसाठी 4194 कोटी रुपयांचा जो निधी देण्यात येणार आहे तो या खात्यावर जमा करण्यात येणार आहे व त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागाद्वारे लवकरात लवकर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे याकरीता काम करत आहे. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडा कालावधी हा लागतोच. सोयाबीन व कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचा बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल, असे देखील कृषी विभागाने म्हटले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता कृषी विभागाला संमती पत्र व न हरकत प्रमाणपत्र भरून देण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पेऱ्यात सातबारावर सोयाबीन व कापूस नोंदी केलेल्या आहेत. परंतु यादीत नाव नाही.
त्यामुळे शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करत आहेत. तर महसूल विभागाने दिलेल्या डाटानुसार यादी जाहीर करण्यात आल्याची कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच या यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात अनुदान जमा केले जाणार आहे. पण या सगळ्यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झाले आहेत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.