अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा तुम्हाला मिळाले की नाही ते पहा.

आज आपण सदर लेखातून महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनामार्फत राबवली जात आहे. या योजनेसाठी महिलांनी फॉर्म देखील भरलेले आहेत. तसेच काही महिलांनच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

पात्र महिलांच्या बँक खात्यात 14 ऑगस्टपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून आतापर्यंत एक कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे आपण घरी बसल्या देखील पाहू शकता त्याचबरोबर कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया.

या महिलांच्या खात्यात पैसे जमा-

ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरला होता व त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, असा मेसेज आलेल्या सर्व महिलांना त्याचबरोबर त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा महिलांनच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत.

अर्ज मंजूर झालेला मेसेज न आलेल्यांनी काय करावे?-

शासनाने भरपूर महिलांचे अर्ज हे मंजूर केलेले आहेत. परंतु काही महिलांना अर्ज मंजूर होऊन देखील मेसेज आलेला नाही. परंतु अशा महिलांनी याची काळजी करण्याची गरज नाही. कारण अर्ज मंजूर झालेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचे पैसे हे मिळणारच आहेत. फक्त त्या महिलेचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.

जर बँक खाते लिंक नसेल तर काय करावे?-

जर आधार कार्डशी बँक खाते लिंक नसेल तर लगेच आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडावे. म्हणजे थेट आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या पोस्ट बँक मध्ये 3 हजार रुपये जमा होतील किंवा आपल्या जवळील बँकेच्या शाखेत जाऊन बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील  जॉईन करा.

धन्यवाद!

आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *